Talathi Bharti Question 19,20,21 august 2023
(1st Shift, 2nd Shift, 3rd Shift.
📕 प्रश्न : कोणत्या राज्यात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे ?
उत्तर – सिक्कीम ✅
📕प्रश्न : महात्मा गांधीजींच्या जातीविषयक विचारांना कोणी विरोध केला होता ?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅
📕प्रश्न : 1888 साली सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
उत्तर : गोपाळ गणेश आगरकर ✅
📕 प्रश्न : पंतप्रधान जनविकास कार्यक्रम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
उत्तर : अल्पसंख्यांक✅
📕प्रश्न : माहितीच्या अधिकारानुसार माहिती अधिकाऱ्याला माहिती देण्यास उशीर झाला तर त्याला दिवसाला किती दंड भरावा लागतो ?
उत्तर : 250₹ ✅
📕 प्रश्न : माझी जन्मठेप या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : वि. दा. सावरकर ✅
📕प्रश्न : भारतात ग्रीन फिल्ड विमानतळ किती आहेत ?
उत्तर : 11✅
📕प्रश्न : रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो !
उत्तर : जीवनसत्व अ ‘✅
📕प्रश्न : भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार जात लिंग धर्म व भेदभाव करण्यास सक्त मनाई आहे ?
उत्तर : कलम 15 (1)✅
📕प्रश्न : भारतातील घटक राज्यांची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते ?
उत्तर : कलम 2 ✅
📕प्रश्न : बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
उत्तर : जगन्नाथ शंकर शेठ 1822 साली✅
📕प्रश्न : भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?
उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले (1905 साली)✅
📕प्रश्न : भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो कोणत्या शहरात धावली ?
उत्तर : कोलकत्ता ✅
📕प्रश्न : दूध सागर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर : मांडवी नदी✅
📕प्रश्न : 2011 च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे ?
उत्तर : लक्षद्वीप ✅
📕 प्रश्न : बाल कामगार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?
उत्तर : 23 डिसेंबर 1986 ✅
📕प्रश्न : 2011 च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रौढ लिंग
गुणोत्तर आहे ?
उत्तर : केरळ ✅
📕प्रश्न : एल एम सिंघवी समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
उत्तर : 1986 साली ✅
📕प्रश्न : समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली ?
उत्तर : डॉ बाबासाहेब आंबेडकर✅
📕प्रश्न : भारत देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य कोणते ?
उत्तर : हिमाचल प्रदेश ✅
📕 प्रश्न : गीताई हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
उत्तर – विनोबा भावे ✅
📕प्रश्न : सर्वात जास्त प्रथिने असणारी वनस्पती पदार्थ कोणते आहेत ?
उत्तर : डाळी ✅
प्रश्न : ‘स्मृतीचित्र’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर : लक्ष्मीबाई टिळक
📕प्रश्न : ‘युगंधर’ या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
उत्तर : शिवाजी सावंत (मृत्युंजय, छावा) ✅
📕प्रश्न : ‘भिजकी वही’ हा कथासंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे ?
उत्तर : अरुण कोल्हटकर✅
📕प्रश्न : ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे✅
📕प्रश्न : भारतीय हवामानाची विषमता खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये आढळते ?
उत्तर : दख्खनचा पठार✅
📕प्रश्न : रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणते विटामिन कार्य करते ?
उत्तर : विटामिन K ✅
📕प्रश्न : रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आहे ?
उत्तर – कर्मवीर भाऊराव पाटील ✅