What is GI Tag ! GI टॅग काय आहे ❓

By MPSC Corner

📙 GI टॅग काय आहे ❓


एखाद्या भागातील वस्तू वा पदार्थ हे त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास त्यास जीआय (Geographical Indication) टॅग देण्यात येतो.

☄ वर्ष 2004 मध्ये ‘दार्जिलिंग टी’ GI टॅग मिळवणार पहिले भारतीय उत्पादन होते.

☄ GI टॅग ला औदयोगिक संपत्तीच्या संरक्षणासाठी पॅरिस करारानुसार बौद्धिक संपदा अधिकार चा एक घटक या रुपात सहभागी करण्यात आले.

☄राष्ट्रीय स्तरावर वस्तूंना भौगोलिक संकेतांक देण्याचे हे काम The Geographical Indications of Goods (Registration and Protection) Act, 1999 नुसार केले जाते, जे सप्टेंबर 2003 पासून सुरू झाले.


✅ तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी मोफत टेस्ट सोडवायच्या आहेत का असेल तर  – Click Here.


⭕️ GI टॅग चे फायदे : ⭕️

भौगोलिक संकेतांक प्राप्त वस्तुना कायदेशीर संरक्षण मिळते.

नोंदणीकृत भौगोलिक संकेतांक वस्तूला अनाधिकृत वापरा पासून थांबवता येते संबंधित भौगोलिक क्षेत्रात उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांची आर्थिक समृद्धी वाढते.

❇️ भौगोलिक संकेतांक ची वैधता ❇️

📌 भौगोलिक संकेतांक ची वैधता ही 10 वर्षाची असते.

📌 10 वर्षानंतर पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागते.

▪️ भौगोलिक संकेतांक चा नोंदणीकृत मालक कोण असतो ?

👉 कायद्याने स्थापित कोणताही संघ, संघटना, त्यातील एखादी व्यक्ती, किंवा उत्पादक मालक असू शकतो.

▪️भौगोलिक संकेतांक किवा चिन्ह हे WTO च्या करारानुसार संबंधित बौद्धिक संपदा आधिकारद्वारे ( TRIPS) नियंत्रित केले जाते.

▪️औदयोगिक संपत्तीच्या संरक्षणासाठी ‘पॅरिस कन्व्हेंशन’ कलम 1 (2) व 10 नुसार भौगोलिक संकेतांक IPR चे एक तत्व या रुपात सहभागी करून घेतले.

माहिती आवडल्यास मित्रांना share करून ,तुम्ही पण save करून ठेवा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button