Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 26

By MPSC Corner

Mathematics and Intelligence Practice Test | Maths practice Question Paper ! गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 26

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता या विषयावर आधारित टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 20

5 गायी व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे. तर 3 गायी व 5 म्हशींची किंमत एकूण 18500 रु. आहे. तर प्रत्येक गाईची किंमत किती ?

2 / 20

1996 ची सुरूवात सोमवारने झाली असेल, तर 1999 ची सुरूवात कोणत्या वाराने होईल ?

3 / 20

(7Y/3) - 4==(2Y/6) + 8 तर Y = ?

4 / 20

एका व्यासपीठावर 18 वक्ते होते. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलन होतील ?

5 / 20

500 शेळ्यांना 27 दिवस पुरेल इतका चारा होता. 3 दिवसानंतर 300 शेळ्या नविन आल्या. तर शिल्लक राहिलेला चारा त्या सर्व एकूण शेळ्यांना किती दिवस पुरेल ?

6 / 20

2(1/3) +A +1(1/6) = 5 (1/4) असेल तर A = किती

7 / 20

12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती ?

8 / 20

दोन संख्याचा लसावि 1056 असून त्यांचा मसावि 12 आहे. त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या किती ?

9 / 20

दर साल दर शेकडा (द.सा.द.शे.) 5% दराने 8000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज सांगा.

10 / 20

(2.19 x 0.0203 x 8.5) / (0.17 x 0.0073 × 0.007) = ?

11 / 20

पहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% व 50% ने जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती ?

12 / 20

1 मे रोजीच तापमान 45.6°C होते. 2 मे ते 6 मे पर्यंतचे सरासरी तापमान 42.3 °C होते व 7 मे रोजीचे तापमान 46°C होते. तर 1 मे ते 7 मे पर्यंतचे सरासरी तापमान किती ?

13 / 20

एका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले, तर सरळव्याजाचा दर किती ?

14 / 20

जर= (x / √128) = (√162 / x) तर x = ?

15 / 20

P या नळाने पाण्याची 3/5 टाकी भरण्यास 18 तास लागतात, तर ती टाकी पूर्ण भरण्यास अजून किती तास लागतील ?

16 / 20

तीन संख्यापैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट तर दुसरी संख्या तिसरीच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 10 येते. तर त्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?

17 / 20

एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील ?

18 / 20

4 बहिणींच्या 5 वर्षापुर्वी वयांची बेरीज 80 वर्ष होती, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती ?

19 / 20

एक पोलीस चोराला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत आहे. चोर 10 पावले पळाला की पोलीस 8 पावले पळतो. मात्र पोलिसाच्या 5 पावलांचे अंतर चोराच्या 7 पावलाच्या अंतराबरोबर आहे तर पोलीस व चोर यांच्या पळण्याच्या वेगाचे प्रमाण किती आहे ?

20 / 20

एका शिक्षकाने 10, 15 किंवा 18 विद्यार्थ्याच्या रांगाची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली तर त्या शिक्षकासोबत कमीतकमी किती विद्यार्थी होते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button