सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस भरती, तब्बल 3000 जागा, अर्ज करा | Central Bank of India Apprentice Bharti 2024

By MPSC Corner

Central Bank of India Apprentice Bharti: नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदासाठी बंपर भरती निघाली आहे. बँकेद्वारे या Apprentice Bharti साठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीसाठी एकूण 3000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, त्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जे उमेदवार पदवीधर आहेत, किंवा कोणतेही पदवी शिक्षण पूर्ण केलेले असेल त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. इतर कोणत्याही उमेदवाराला या भरती साठी पात्र ठरवले जाणार नाही.

अप्रेंटिस पदासाठी भरती होणार आहे, त्यामुळे तुम्ही जर बँकेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असाल. तर तुमच्या साठी नोकरी मिळवण्यासाठीची ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.

उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळे बँकेने जी लिंक दिली आहे, त्यावरूनच फॉर्म भरा.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2024 आहे, या भरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढे अजून मुदतवाढ मिळणार नाही, त्यामुळे तात्काळ मुदत संपण्यापूर्वी अर्ज करून घ्या.

Central Bank of India Apprentice Bharti 2024

भरतीचे नावCentral Bank of India Apprentice Bharti
एकूण जागा3000
अर्ज पद्घतीऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळयेथे पहा

Central Bank of India Apprentice Bharti Vacancy Details

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती मध्ये अप्रेंटिस (Apprentice) या पदासाठी रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 3000 अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

संपूर्ण भारतात असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या विविध शाखेतील रिक्त जागा या भरती द्वारे भरल्या जाणार आहेत.

Central Bank of India Apprentice Bharti Education Qualification

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती साठी शैक्षणिक पात्रता निकष देखील ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार या Apprentice Bharti साठी पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी ते उमेदवार फॉर्म भरण्यासाठी पात्र असणार आहेत.

इतर कोणत्याही स्वरूपाची पात्रता निकष या भरतीसाठी लावण्यात आले नाहीत, केवळ हा एकच शैक्षणिक पात्रता निकष सांगण्यात आला आहे.

Central Bank of India Apprentice Bharti Age Limit

भरतीसाठी वयोमर्यादा निकष देखील ठरवण्यात आले आहेत, या निकषा द्वारे पण उमेदवाराची पात्रता ठरवली जाणार आहे. जे उमेदवार ठरवलेल्या योग्य वयोमर्यादा निकषांचे पालन करतील, त्यांना अर्ज करता येणार आहे.

दिनांक 31 मार्च 2024 रोजी उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्षे या दरम्यान असावे. वय कमी जास्त असेल तर तो उमेदवार अर्ज करू शकणार नाही, त्याला ऑनलाईन फॉर्म भरतानाच अर्ज करता येणार नाही.

वयोमर्यादा सूट

या भरतीसाठी वयाची अट ही काही प्रवर्गासाठी शिथिल करण्यात आली आहे. त्यात SC, ST, OBC प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश असणार आहे.

  • SC प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट
  • ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट

Central Bank of India Apprentice Bharti Exam Fee

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती साठी ऑनलाईन अर्ज करताना परीक्षा फी भरणे अनिवार्य असणार आहे. ही परीक्षा फी प्रवर्गानुसार वेगवेगळी असणार आहे, त्यामुळे तुम्ही ज्या प्रवर्गात येता, त्यानुसार तुम्हाला फीस भरायची आहे.

  • General, OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये
  • SC, ST, महिला उमेदवारांसाठी 600 रुपये
  • PWD प्रवर्गातील उमेदवारांना 400 रुपये

फी सोबत GST देखील भरायची आहे, त्यामुळे वर दिलेली फी आणि सोबत आगाऊ GST रक्कम देखील भरणे अनिवार्य आहे.

Central Bank of India Apprentice Bharti Important Date, Links

ऑनलाईन फॉर्मची Last Date27 मार्च, 2024
ऑनलाईन परीक्षा Date31 मार्च, 2024
भरतीची जाहिरातPDF पहा
ऑनलाइन फॉर्मयेथून भरा

Central Bank of India Apprentice Bharti Apply online

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी बँकेद्वारे अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे.

वर दिलेल्या ऑनलाईन फॉर्म येथून भरा लिंक वर क्लिक करून तुम्हाला साईट वर जायचे आहे. आणि तेथून या Apprentice Bharti साठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज करताना आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, नंतर आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. मग शेवटी परीक्षा फी भरायची आहे.

नंतर एकदा भरतीचा अर्ज तपासून पाहायचा आहे, एखादी Spelling mistake झाली असेल तर ती लागलीच दुरुस्त करून घ्यायची आहे. ती दुरुस्त झाल्यावर मगच फॉर्म सबमिट करायचा आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च, 2024 आहे, आणि पुढच्या 4 दिवसात ऑनलाईन परीक्षा पण आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे तयारी ठेवायची आहे. आणि जशी बँके द्वारे अपडेट येईल, त्यावेळी सूचनांचे पालन करायचे आहे.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button