भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदासाठी बंपर भरती! तब्बल 9144 रिक्त जागा | RRB Technician Bharti 2024

By MPSC Corner

RRB Technician Bharti: मित्रांनो भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदासाठी ग्रेड 1 आणि ग्रेड 3 साठी तब्बल 9144 एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे विभागाद्वारे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे, त्यानुसार आता पात्र उमेदवारांचे अर्ज देखील सुरू झाले आहेत.

ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून या भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे, कोणत्याही इतर मार्गाने सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही पुढच्या महिन्यातील 8 तारीख आहे, म्हणजे 08 एप्रिल 2024 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे.

RRB Technician Bharti 2024

भरतीचे नावRRB Technician Bharti
एकूण जागा9144
अर्ज पद्घतीऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळयेथे पहा

RRB Technician Bharti Vacancy Details

भारतीय रेल्वेत टेक्निशियन भरती साठी एकूण 2 पदासाठी 9144 एवढ्या रिक्त जागांवर भरती निघाली आहे. पदानुसार जागांचे विभाजन करण्यात आले आहे, सर्वात जास्त रिक्त जागा या टेक्निशियन ग्रेड III या पदासाठी आहेत, तर सर्वात कमी जागा या टेक्निशियन ग्रेड I सिग्नल या पदासाठी निघाल्या आहेत.

पदाचे नावपद संख्या
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल1092
टेक्निशियन ग्रेड III8052
Total9144

RRB Technician Bharti Education Qualification

रेल्वे भरती साठी पदानुसार शैक्षणिक पात्रता ही भिन्न आहे, यामधे उमेदवार हा किमान 10 वी उत्तीर्ण असावा, तसेच त्याने संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा. सोबतच उमेदवार जर पदवीधर असेल तर अशा उमेदवारांना देखील प्राधान्य असणार आहे.

पद क्र.1:

उमेदवार हा B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा.

पद क्र.2:

उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा, तसेच त्याने संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असावा.

[Forger and Heat Treater/Foundryman/Pattern Maker/Moulder (Refractory)/Fitter (Structural)/ Welder/ Carpenter/Plumber/Pipe Fitter/Mechanic (Motor Vehicle)/Material Handling Equipment cum Operator/Crane operator/operator Locomotive and Rail Cranes./ Electrician/ Mechanic Auto Electrical and Electronics/Wireman/Electronics Mechanic/ Mechanic Power Electronics/Mechanic Diesel/Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles)/ Mechanic Automobile (Advanced Diesel Engine)/Tractor Mechanic/ Painter./ Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/Electronics Mechanic./ Painter General /Machinist/ Carpenter./Electrician/Wireman/Electronics Mechanic/Mechanic Power Electronics/Mechanic (HT, LT Equipments and Cable Jointing)/ Welder/ Machinist/ Carpenter/Operator Advanced Machine Tool/Machinist (Grinder)/Refrigeration and Air Conditioning Mechanic /Wireman/ Electronics Mechanic/Instrument Mechanic/ Mechanic Mechatronics /Turner/Welder (Gas and Electric)/Gas Cutter/Welder (Structural)/Welder (Pipe)/Welder (TIG/MIG)]

RRB Technician Bharti Age Limit

भारतीय रेल्वेत टेक्निशियन पदासाठी निघालेल्या या भरती मध्ये उमेदवारांना वयाची अट ही सांगण्यात आली आहे. पदानुसार वयोमर्यादा भिन्न आहे, तसेच काही राखीव वर्गासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.

  • पद क्र.1: 18 ते 36 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 33 वर्षे

वयाची अट शिथिल

  • SC प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट
  • ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांची सूट
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांची सूट

RRB Technician Bharti Exam Fee

रेल्वे भरती साठी ऑनलाईन स्वरूपात परीक्षा होणार आहे, त्यासाठी फॉर्म भरताना सोबत परीक्षा फी भरणे देखील अनिवार्य आहे.

विविध प्रवर्गानुसार परीक्षा फी वेगवेगळी असणार आहे, राखीव प्रवर्गात असलेल्या उमेदवारांना मात्र फी मध्ये सूट देण्यात आली आहे.

  • General, OBC, EWS प्रवर्गासाठी 500 रुपये फी
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला साठी 250 परीक्षा फी

RRB Technician Bharti Important Date, Links

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख08 एप्रिल 2024
ऑनलाईन परीक्षेची तारीखऑक्टोबर & डिसेंबर 2024
भरतीची जाहिरातPDF पहा
ऑनलाईन फॉर्मयेथून भरा

RRB Technician Bharti Apply online

रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सुरू झाले आहेत, अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. त्याची लिंक वर दिली आहे, ऑनलाईन फॉर्म येथून भरा या लिंक वर क्लिक करून साईट ला भेट द्या.

साईट वर गेल्यावर तेथे तुम्हाला भरतीची फॉर्म मिळेल, तो तुम्हाला भरायचा आहे. आवश्यक ती सर्व माहिती त्यात टाकायची आहे.

जाहिराती मध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही ज्या प्रवर्गात येता, त्यानुसार तुम्हाला लागू होणारी परीक्षा फी भरून घ्यायची आहे.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचा भरतीचा फॉर्म सबमिट करायचा आहे. त्याअगोदर फॉर्म योग्य भरला आहे का याची खात्री करून घ्यायची आहे.

थोडक्यात तुम्ही अशा प्रकारे रेल्वे टेक्निशियन भरतीसाठी तुमचा अर्ज अगदी सहज सोप्या पद्धतीने सादर करू शकता.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button