पोलीस भरती 2024, 17 हजार + रिक्त जागा! 10 वी 12 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी, अर्ज करा | Maharashtra Police Bharti 2024

By MPSC Corner

Maharashtra Police Bharti: मित्रांनो राज्य शासनाने अखेर महाराष्ट्र पोलीस भरती साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तब्बल 17 हजार पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन शासनाद्वारे करण्यात आले आहे. जे विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून पोलीस भरतीची तयारी करत होते, विशेष त्यांच्या साठी ही मोठी आनंदाची आणि स्वप्नपूर्तीचा बाब आहे.

पोलीस भरती साठी 17311 एवढ्या प्रचंड प्रमाणात रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यात अजून एक विशेष आणि महत्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला कळाली तर तुम्ही लगेच पोलीस भरती साठी फॉर्म भराल, ती म्हणजे यंदाची पोलीस भरती ही इयत्ता 10 वी पास आणि 12 वी पास वर होणार आहे.

म्हणजे बघा तुम्ही जर 10 वी किंवा 12 वी पास असाल, तर तुमच्या साठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. एकूण 5 पदांसाठी भरती निघाली आहे, त्यात 17,311 एवढ्या रिक्त जागा आहेत.

10 वी पास वर पोलीस बॅन्डस्मन या पदाची भरती होणार आहे, त्यामुळे तुम्ही जर केवळ 10 वी पास असाल, तर या पोलीस बॅन्डस्मन पदासाठी अर्ज सादर करा.

सोबत 12 वी पास वर पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF आणि कारागृह शिपाई अशा उर्वरित 4 पदांची भरती होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर 12 वी पास असाल, तर यापैकी कोणत्याही पदासाठी तुम्हाला अर्ज करता येईल.

पोलीस भरती संबंधी अजून महत्वाची आणि आवश्यक अशी माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, त्यामुळे तुम्ही कृपया हा लेख काळजीपूर्वक वाचा. आणि सांगितल्या नुसार अर्ज सादर करा, त्या बरोबर शासनाने पोलीस भरती साठी काढलेली जाहिरात पण एकदा वाचून घ्या.

Maharashtra Police Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

पदाचे नाव

पद संख्या

पोलीस शिपाई (Police Constable)

9532

पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)100
पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)1686
पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)4293
कारागृह शिपाई (Prison Constable)1800
Total17311

🙋 Total जागा – एकूण 17,311 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

पोलीस भरती साठी पदानुसार शैक्षणिक पात्रता सांगण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे. याची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे.

  • पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  • पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवार हा किमान 18 वर्षे वयाचा असावा.

💵 अर्ज शुल्क (Fees) – 450 रुपये [मागासवर्ग: 350 रुपये]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 31 मार्च, 2024

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
📝 ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)येथे पहा

Maharashtra Police Bharti Qualification Details

 

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शासनाने बरेचसे पात्रता निकष ठरवले आहेत, त्याची माहिती सविस्तरपणे माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू या.

Maharashtra Police Bharti Education Qualification

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही महत्वाची आहे, पदानुसार ही पात्रता सांगण्यात आली आहे.

पोलीस शिपाईइयत्ता 12वी उत्तीर्ण
पोलीस शिपाई-वाहन चालकइयत्ता 12वी उत्तीर्ण
पोलीस शिपाई-SRPFइयत्ता 12वी उत्तीर्ण
कारागृह शिपाईइयत्ता 12वी उत्तीर्ण
पोलीस बॅन्डस्मनइयत्ता 10वी उत्तीर्ण

Maharashtra Police Bharti Age Limit

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा निकष पुढीलप्रमाणे आहेत:

  • पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

वरील प्रमाणे पोलीस भरती साठी वयाची अट असणार आहे, पदा नुसार हे निकष भिन्न आहेत. परंतु उमेदवार हा किमान 18 ते 19 वर्षे वयाचा असणे सर्व पदांसाठी अनिवार्य आहे.

Maharashtra Police Bharti Physical Qualification

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रता निकष हे खालील प्रमाणे असणार आहेत:

उंची/छातीपुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छातीन फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

पोलीस भरतीसाठी शारीरिक पात्रता ही उंची आणि छाती या स्वरूपात असणार आहे, पुरुष आणि महिलांसाठी ही पात्रता निकष वेगवेगळे असतील.

Maharashtra Police Bharti Apply online

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ नव्याने सुरू केले गेले आहे, त्याची लिंक आपण वर दिली आहे. अधिकृत साईट वर गेल्यावर तेथे तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती साठी Apply Online असा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.

मग जो फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये उमेदवारांना आवश्यक ती सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर जाहिराती मध्ये दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर तुम्हाला जी परीक्षा फी लागू असणार आहे, ती Exam Fees भरून घ्या. शेवटी अर्ज सबमिट करून टाका. म्हणजे तुमचा फॉर्म पोलीस भरती साठी सादर होईल.

Maharashtra Police Bharti Physical Exam Test

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी घेताना दिले जाणारे गुण मार्क पुढीलप्रमाणे:

पुरुषमहिलागुण
धावणी (मोठी)1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणी (लहान)100 मीटर100 मीटर15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक)15 गुण
Total50 गुण

एकूण 50 मार्काची चाचणी असणार आहे, त्यामध्ये 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, आणि गोळा फेक सामील आहे. यामधे प्रत्येक पोलीस भरती चाचणी ला मार्क दिले जाणार आहेत. ज्या उमेदवारांना जास्त मार्क पडतील त्यांना पोलीस भरती साठी निवड प्रक्रियेत फायदा होणार आहे.

Maharashtra Police Bharti FAQ

महाराष्ट्र पोलीस भरती साठी एकूण रिक्त जागा किती आहे?

एकूण 17311 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे?

पोलीस भरती साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च, 2024 आहे.

पोलीस भरती साठी वयोमर्यादा निकष काय आहेत?

पोलीस भरती साठी पदा नुसार वयाची अट असणार आहे, अधिक माहिती तुम्ही या लेखामधून घेऊ शकता.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button