📕 कायमधारा पद्धत व रयतवार पद्धत 📕

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

. 📕 कायमधारा पद्धत 📕


1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवालीसने कायमधारा पद्धत सुरु केली.

✅ सर्वप्रथम बंगाल, बिहार व ओरीसा (ओडिशा) प्रांतात ही सुरु केली.

✅ या पध्दतीलाच जमीनदारी पध्दत असेही म्हणतात.

✅ शेतकऱ्यांवर लावण्यात येणाऱ्या महसुलाची रक्कम ठरविण्यात आली.

✅ जमिनदाराने ही रक्कम शेतकऱ्यांकडुन जमा करुन वेळीच सरकारी खजिन्यात जमा करणे. भारताच्या 19% भागात ही पध्दत होती. यामुळे सरकारला कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले.

✅ ही योजना सर जॉन शोअर व जेम्स ग्रँट यांच्या सहकार्याने केली.

✅ जमीनीची मालकी कायमपणे वंशपरंपरागत आणि हस्तांतरीत स्वरुपात देण्यात आली होती.


 📕 रयतवारी पद्धत 📕


थॉमस मन्रो व कॅ.रीड यांनी 1820 मध्ये रयतवारी पध्दत सुरु केली.

✅ मुंबई, पुर्व बंगाल, मद्रास आसामचा काही भाग व कर्नाटकचा (कुर्ग) काही भाग या प्रांतात लागु केली.

✅ प्रत्यक्ष जमिन कसणाऱ्याच्या ऐपतीनुसार महसुल आकारणी ठरविण्यात आली. भारताच्या 51% प्रदेशात ही पध्दत होती.

✅ जमिनीची मोजनी आणि त्यातुन मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज काढण्यात आला.

✅ एकूण उत्पादनाच्या 55% महसुलाची सरकारची मागणी कायम करण्यात आली.

✅ यामुळे 1875 मध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी उठाव केला.

✅ शेतकरी जमिनीचे खऱ्या अर्थाने मालक बनु शकले नाही.

✅ दुष्काळी परिस्थितीत शेतसारा भरण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनी विकण्याची वेळ आली.


 

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button