छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधामंडळ जाणून घ्या मराठी माहिती.
💥 राज्याचा प्रचंड भार सांभाळायचा तर राज्यव्यवस्था बळकट असणे अत्यावश्यक. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला स्वराज्याचा रथ सुरळीत चालावा यासाठी प्रधान, अधिकारी, सरदार यांची अत्यंत दूरदृष्टीने निवड केली होती.
💥राज्यव्यवस्थेत राजाच्या खालोखाल येत असे ते प्रधान मंडळ. शिवाजी महाराजांचे प्रधान मंडळ हे आठ जणांचे असल्याने त्यास अष्टप्रधान मंडळ असे नाव होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोण प्रधान होते व त्यांची कामे काय होती याचा विचार या लेखात करू.
पद | व्यक्ती | कार्य |
मुख्यप्रधान {पंतप्रधान } | मोरोपंत त्रंबक कांबळे | राज्यकारभार चालविणे |
आमात्य | रामचंद्र नीलकंठ मुजुमदार | जमाखर्च पाहणे |
सचिव {सुरनीस } | अण्णाजी दत्तो | आज्ञापत्रे तयार करणे |
मंत्री | दत्ताजी त्रंबक वाकनीस | पत्रव्यवहार व वैयक्तिक संरक्षण |
सेनापती | हबीरराव मोहिते | सैन्याची व्यवस्था पाहणे |
सुमंत | रामचंद्र त्रंबक डबीर | परराज्य ,परराष्ट्र सबंध ठेवणे |
न्यायाधीश | निराजीपंत रावजी | स्वराज्याचे सरन्यायाधीश |
पंडित | मोरेश्वर पंडितराव | धर्मखात्याचे प्रमुख |
✅ थोडीच पण महत्वपूर्ण माहिती नक्की वाचून काढा.👇👇
▪️पंडीतराव व न्यायाधीश सोडुन बाकी सर्वांना प्रसंग पडल्यास लष्करी मोहीमेवर जावे लागे.
▪️छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रदेश सरसुभा सुभा-परगणा यामध्ये विभागले होते.
▪️सरसुभ्यावरील प्रमुखास सरसुभेदार म्हणत असे.
▪️परगण्यावरील प्रमुखास सरहवालदार म्हणत असे व सुभ्यावरील प्रमुखास सुभेदार म्हणत असे.
▪️ परगण्यात अनेक महाल असत तर त्या महालांवर हवालदार नावाचा अधिकारी होते.
▪️लहान खेड्याला मौजे म्हंटले जाई व मोठ्या खेड्याला कसबा म्हंटले जाई.
▪️छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजव्यवहार कोश तयार करून घेतला होता. प्रत्येक खेड्यात पाटील, कुलकर्णी, चौगुले असे वतनदार अधिकारी असत.
▪️पेठे मध्ये महाजन असे वतनदार असत, व परगण्यामध्ये देशमुख, देशपांडे असे वतनदार असत.
▪️छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात 18 कारखाने व 12 महाल होते.
▪️राज्यातील न्यायाच्या क्षेत्रातील अंतिम अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते.
🎯 गावातील खटल्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी जी सभा घेतली जात असे तिला गोतसभा असे म्हटले जाई.
📌 छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात दोन प्रकारचे घोडदळ होते.
1) बारगीर – सरकारी मालकीची असत.
2) शिलेदार – खासगी मालकीची असत.
📌छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्यामध्ये तीन प्रकारचे किल्ले असत.
1) पर्वतावरील किल्ले – गड – रायगड, प्रतापगड
2) समुद्रातील किल्ले – जंजीरा, विजयदुर्ग
3) सपाट भुमिवरील किल्ले – कोट – भुईकोट
🔘 छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात एकूण सुमारे 370 किल्ले होते. किल्ल्यावर तीन प्रमुख अधिकारी नेमले जात असे.
1) हवालदार – संरक्षण
2) सबनीस – जमाखर्च
3)कारखानीस – अन्नधान्य पुरवठा
▪️ छत्रपती शिवाजी महाराजांना इतिहासकारांनी किल्ल्यांचा राजा असे म्हंटले आहे. मायनाईक आणि दर्यासारंग ही आरमार प्रमुखाची पदे निर्माण केली गेली.
📌 पुरंदरचा तह 14 जुन 1665 रोजी छ. शिवाजी महाराज व मोगल यांच्यात पुरंदरच्या पायथ्याशी झाला. छत्रपती शिवरायांची शेवटची मोहिम कर्नाटक मोहिम होती. त्यात त्यांनी कुतुबशाहाशी मैत्री केली.
📌दक्षिणेत त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकला होता. निधन 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले.
😍 छत्रपती शिवाजी महाराजांची रणनिती, दूरदृष्टी, गनिमी कावा, संघटनकौशल्य, प्रजाहितदक्षता, शौर्य, अद्वितीय असेच होते.
✓ माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.