📕 word of mouth ! शब्दसिद्धी 📕

🔥 खूप महत्वाचे आहे , शब्दसिद्धी चे सर्व PYQ आणि महत्वाचे शब्द देण्याचा प्रयत्न केला आहे 🙏 


         🔥🔥 शब्दसिद्धी 🔥🔥


📕 तत्सम शब्द   – 

संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे म्हणजे ज्यांच्या रुपात काहीही फरक (बदल) न होता मराठी भाषेत आले आहे त्यांना  ‘तत्सम शब्द’ असे म्हणतात. 

तत्सम शब्दांची उदाहरणे 👇

पुष्प, वन, जल, अंध,  प्रीती, भीती, शिखर, कर, कविता,  ग्रंथ, सूत्र, पृथ्वी, भूगोल, भगवान, मंत्र,  परंतु, कार्य, अद्यापी, यथामती, कन्या, वृक्ष, पिता, धर्म, कवी, मधु, गुरु, लघु, पुत्र, सत्कार, शिशु, वृद्ध.


☄ Www.MpscCorner.com


📕 तद्भव शब्द – 

काही संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रुपात बदल होऊन येतात त्यास ‘तत्भव शब्द’ असे म्हणतात. 

• तद्भव शब्दांची उदाहरणे👇

घर (गृह), हात(हस्त), गाव(ग्राम), चाक(चक्र), कान(कर्ण), पान(पर्ण), आग(अग्नी), दुध(दुग्ध), पाय(पद), भाऊ(भ्रात), सासु(स्वश्रू), सासरा(स्वसु), घास(ग्रास), कोवळा(कोमल).


📕 देशी –

मराठीत काही शब्द असे आढळतात की ते तत्सम, तत्भव किंवा परीभाषीय नाहीत त्यांना ‘देशी शब्द’ असे म्हणतात.

देशी शब्दांची उदाहरणे👇

गुढगा, ढेकुण, वांगी, झाड, दगड, डोके, पीठ, पोट, बाजरी, चिमणी, बोका, रेडा, खुळा, कंबर, लुगडे, जोडा, घोडा, डोळा, हाड, झोप. 


☄ Www.MpscCorner.com


📕 फारसी शब्द – 

अत्तर, अब्रू, पतलून, पेशवा, खाना, सामना, हकीकत, पोशाख, फौजू, पागा, लष्कर, स्वार, गोलंदाज, समशेर, तंबू, शामियाना, लगाम, खंदक, बुरुज, किल्ला, ईमारत, मखमल, चादर, राजाई, खुर्ची, नेज, पलंग, समई, पानदान, अगरबत्ती, अंगूर, किशमिश, पिस्ता, बदाम, अफू, खरबूज, डफ, ढोल, तबला, दिलरुबा, नगारा, शहनाई, कमल, दरबार.


☄ Www.MpscCorner.com


📕 अरबी शब्द – 

मंजुळ, मजबूत, मगरूळ, शाहीर, जाहीर, साहेब, अक्कल, हलवा, मिठाई, अर्ज, उर्फ, इनाम, खर्च, मेहनत


📕 पोर्तुगीज शब्द – 

बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, मेझ, इस्त्री, पपई, परात, पेरू, टिकाव, कर्नल, अननस, बिस्कीट, पुरावा, सबब, शिरबेज, शीर, बटवा, बंब, काडतूस, तुरुंग


☄ Www.MpscCorner.com


📕 तेलगू शब्द – 

ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी 


📕 कानडी शब्द – 

भाकरी, तूप, अक्का, अन्ना, कुंची, गाजर, उडीद, बुडीद, भांडे, अडकित्ता, खलबत्ता, ताई, विळी, चाकरी, पेटी, लवंग 


📕हिंदी शब्द – 

दाम, करोड, बात, दिल, बच्चा, और, भाई


📕 गुजराती शब्द – 

घी, दादर, शेठ, दलाल, डब्बा, रिकामटेकडा


📕 इंग्रजी शब्द – 

मास्तर, स्टेशन, सायकल, बस, डॉक्टर, सर्कस, फाईल, फी, सिनेमा, टेलीफोन, रेडीओ, जेट


☄ Www.MpscCorner.com


📕 तुर्की शब्द – 

कालगी, बंदूक, कजाग


📕 तामिळ शब्द – 

चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा


💯 कोणत्याही परीक्षेत यावर 2 ते 3 प्रश्न असतातच , एकदा वाचून घ्या 💯🤞

☄ Www.MpscCorner.com

━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top